
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
आज दि.२८ रोजी शिवसेना शहर कार्यालाय लातूर येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये युवासेना सचिव वरुण सरदेसाई, कोअर कमिटी सदस्य रुपेश कदम यांच्या सूचनेने व युवासेना संपर्क प्रमुख अविनाश खापे व युवासेना जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने आज जळकोट तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जळकोट युवासेना प्रभारी तालुका युवा अधिकारी (प्रमुख)पदी अनिल ढोबळे, जळकोट युवासेना तालुका समन्वयकपदी मुक्तेश्वर येवरे-पाटील अतनूरकर तर जळकोट युवासेना तालुका सोशिअल मीडिया प्रमुख व युवासेना सरचिटणीस पदी बालाजी देवकत्ते यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख लातूर रमण माने, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ बुरबुरे, शिवसेना उपशहर प्रमुख शिवराज मुळावकर, युवासेना तालुका सरचिटणीस विशाल कांबळे, युवासेना शहर प्रमुख लातूर विजय थोडगे, युवासेनेचे संभाजी भैय्या माळी, प्रदीप उपासे, वेंकटेश धोत्रे उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.