
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
राशीन कर्जत तालुक्यांतील बेनवडी गावच्या हद्दीमध्ये पत्र्याच्या शेडला अडकलेली दुधाची बाटली काढताना दोन सख्ख्या भावांचा जागीच अंत झाला. अमोल हनुमंत धुमाळ वय ३० व सचिन हनुमान धुमाळ वय २८ अशी दोन संख्या भावांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन सदरची घटना मंगळवार दि.२८ रोजी सकाळी सातच्या सुमारांस पत्र्यांच्या शेड लाडवली दुधाची बाटली काढण्यासाठी सचिन धडपड करत होता त्यात पाऊस झाल्यांने पत्र्यांच्या शेडमध्ये पाणी साचल्याने विजेचा प्रवाह उतरला असता सचिनला विजेचा धक्का बसला यात सचिनला वाचवण्यासाठी अमोल ही पुढे आला यावेळी त्यालाही विजेचा धक्का बसला व त्याची आई धनश्री आपल्या मुलांना वाचवण्यांसाठी गेले असता.त्यांनाही धक्का बसला मात्र प्रसगांधान हनुमंत धुमाळ यांनी विजेचा प्रवाह असलेली वायर हिसकावून तोडल्यांने धनश्री यांचा जीव वाचला धुमाळ कुटुंबीयांनी कालच नवीन घरावरती स्लॅप टाकला होता.पाऊस झाल्याने सर्वत्र ओलावा निर्माण झाला होता त्यामुळे विजेचा प्रवाह शेडमध्ये उतरला आणि अमोल व सचिनचा जागीच अंत झाला. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अंत झाल्यांने धुमाळ कुटुंबीय बेनवडी परिसरांसह कर्जत तालुक्यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मोठा अमोल चे लग्न झाले असून त्याला सहा महिन्याची मुलगी आहे तर सचिन हा पदवीधर शिक्षण घेत होता.ऐन तारुण्यांत कर्त्या मुलांचा अंत झाल्यांने धुमाळ कुटुंबीयांस सचिन व अमोलच्या आई-वडिलांनी एकच आक्रोंश केला यावेळी सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी सोशल मीडिया वरुन आपले दुःख व्यक्त करीत धुमाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले.