
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी राखून साजरा केला असून, मंगळवारी आणि बुधवारी दूध वितरक आणि पोस्टमन काकांचे पावसापासून संरक्षण व्हावे; यासाठी रेनकोट वाटप केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा १० जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी ते आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी राखून साजरा करत असतात. त्यासाठी कार्यकर्त्यांना हारतुरे नको, समाजातील वंचित घटकांसाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन करतात. त्यांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
यंदा त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मधील रिक्षाचालक आणि दूध व वृत्तपत्र वितरकांना रेनकोटचे वाटप करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार २० आणि २२ जून रोजी रिक्षाचालक आणि वृत्तपत्र वितरकांना रेनकोटचे वाटप केले. त्यानंतर मंगळवारी कोथरूड मधील दूध वितरक आणि बुधवारी पोस्टमन काकांना रेनकोट वाटप केले.
कोथरूड मधील अनेकांनी याचा लाभ घेतला. तसेच, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संवेदनशीलतेप्रती समाधान व्यक्त केले.