
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी- गणेश परचाके
आज दिनांक 29/ 6/ 2022
शिक्षणाचे पहिले दिवस म्हणजेच चिमुकल्याचे खुशीचे दिवस होय. चिमुकल्यांनी गावातील बैलगाडीवर खुशीची फेरी काढून शाळेतील पहिले दिवस आनंदाचे ठरेल. चिमुकले हसत खेळत शाळेला यावे यासाठी खुशीचे कार्यक्रम राबवून चिमुकल्यांना आनंदाचे प्रोस्थान मिळावे आणि चिमुकले रोज हसत खेळत शाळेत यावे. या कार्यक्रमाचे प्रोत्साहन वाढावे म्हणून गावातील प्रतिष्ठित महिला तसेच नागरी यांनी चिमुकल्यांना प्रतिसाद दिला. तसेच शाळा पूर्वी तयारी करून चिमुकल्याचे मनोबल शिक्षणासाठी वाळावे आणि चिमुकले शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद घ्यावा. याच वेळी चिमुकल्यांना पुस्तके वितरण करून त्यांना शिक्षणाच्या बाबी मार्गदर्शन करण्यात आले .त्याच वेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमेश मडावी उपाध्यक्ष अर्चना ताई कोवे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गुलाब मडावी कालिदास मडावी भालचंद्र इस्टम दशरथ सोनटक्के गणपत कोवे गावातील पोलीस पाटील महिला वर्ष इष्टम जया मळावी कमल गेडा रीना पेंडोर निरंजना पेंदोर. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गांगरेडिवार सर तसेच करमे मॅडम तसेच गावातील काही प्रतिष्ठित महिला तसेच नागरिक यांनी मोलाचे प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.