
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐतेहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर संभाजीनगरची घोषणा केली. तेव्हापासून आम्ही संभाजीनगरच म्हणतो. मात्र आज खऱ्या अर्थाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रस्ताव मंजूर केला.
मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर झाला. अनेक वर्षांच्या माझ्यासह अनेक शिवसैनिकांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले.
गल्ली ते दिल्ली असा प्रवास करून माझ्याकडे २० वर्षांपासूनचा पाठपुरावा मी केला. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री यांनी मला आश्वासन दिले, मात्र ते पूर्ण करू शकले नाही. मनपाने,जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आदींनी याकामी सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
लोकसभेत केलेल्या भाषणे आणि पाठपुरावा आता केंद्राने संभाजीनगर आणि राजे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे दोन्हीही नामकरण अधिकृत करून शिक्कामोर्तब करावे. माझ्यासह संभाजीनगर लोकसभेच्या वतीने पुनश्च मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आदींचा मी आभारी मानतो.