
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शिरूर अनंतपाळ…
तालुक्यातील थेरगाव येथील जवान सुर्यकांत शेषेराव तेलंगे हे कर्तव्य बजावत असताना पठाणकोट येथे शहिद झाले.त्यांचे पार्थिव २८ रोजी मंगळवारी दुपारी थेरगावात आल्यानंतर बुधवारी २९ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जवान सुर्यकांत शेषेराव तेलंगे हे सैन्यदलात ७ वर्षांपुर्वी भरती झाले होते.
एका शेतकरी कुटुंंबात त्यांचा जन्म झाला होता.त्यांच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.सुर्यकांत तेलंगे हे अत्यंत मनमिळाऊ होते.ते शहिद झाल्याचे कळताच थेरगाव या जन्मगावी व पंचक्रोशीत दुःखा चा डोंगर पसरला. सुर्यकांत तेलंगे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंचक्रोशीत असंख्य जनसमुदाय थेरगाव येथे उपस्थित होता.