
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- वसंत आवटे
दिवसांनी दिवस कोरोना मधील नव-नवीन व्हरायटी चे वाढते प्रभाव लक्षात घेऊन वाळूज परिसरातील इफ्का लॅबोरेटरिज लिमिटेड या कंपनीने कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याचा विचार करून कामगार सुरक्षित तर संस्था सुरक्षित तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी त्याचप्रमाणे माझी संस्था माझी जिम्मेदारी या उद्देशाने कंपनीमध्ये covid-19 चा पहिला डोस दुसरा डोस बूस्टर डोस या लसीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कामाची सुरुवात जीवन ज्योत हॉस्पिटल चे डॉक्टर श्री पंकज बलदोटा, कंपनीचे युनिट हेड श्री संजय चोबे, श्री व्यंकट मैलापुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर श्री कमलेश जैन, श्री गिरीधर गायकवाड, श्री निलेश त्रिवेदी, श्री आजिनाथ सुरवसे इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री एकनाथ पवार यांनी केले व आभार प्रदर्शन श्री प्रफुल्ल कांबळे यांनी केले.