
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी श्रीमती दीपा मुधोळ मॅडम यांची नव्यांने नियुक्ती करण्यांत आली. तर सांगलीचे मावळते जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यांत आली. श्रीमती दीपा मुधोळ मॅडम या मुख्य प्रशासक न्यु.टाऊन शिप सिंडको (संभाजीनगर) येथील त्या पदभार सांभाळत होत्या. त्यांच्याकडे राज्य शासनांने सांगली जिल्ह्यांची जबाबदारी सोपविली. त्यांनी यापूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी विशेष काम पाहिले शिक्षण आरोग्य, स्त्रीभूषण हत्या या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यांत आले होते. एप्रिल १७ पासून त्या औरंगाबाद येथील राज्य जीएसटी प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासांठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. ई.वे बिल नियमांची पालन करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी खडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला जीएसटी विभागांतून त्यांची डिसेंबर २०१८ मध्ये उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती त्या कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांची प्रशांसन विभागांमध्ये ओळख आहे. सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी पुरीगोसावी आणि श्रीमती दीपा मुधोळ मॅडम यांची उस्मानाबाद जिल्ह्यांपासुन त्यांची ओळख आहे