
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पारडी गाव म्हटलं की लोहा तालुक्यामध्ये या गावाचा वेगळा दरारा आहे.अशा गावात शिवराज पाटील पवार यांचा जन्म ०१ जुलै १९८१ रोजी लक्ष्मीबाई व पांडुरंग पाटील पवार यांच्या उदरी सधन शेतकरी कुटुंबात जन्म झाला.पाच बहिणी तीन भाऊ शिवराज नंतर चा दुसरा भाऊ भगवान सधन शेतकरी तर लहाना भाऊ गणेश छत्तीसगड येथे भारतीय सैन्य दलात उच्च पदावर कार्यरत आहे.असा संसार असताना वडील पांडुरंग पाटील पवार यांनी सर्वांबरोबरच मोठ्या कष्टाने शिवराजला शिक्षण शिकविले. जिल्हा परिषद हायस्कूल पारडी येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर शिवराजला लोह्यातील कै.विश्वनाथराव नळगे विद्यालयात माद्यमिक व नंतर उच्चमाध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश दिला.तेथून शिवराज पुढे श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे त्यांनी बीएचे शिक्षण पूर्ण करतांना वर्ग प्रतिनिधी म्हणून जबाबदारी उत्कृष्ट रित्या पेलली.यानंतर बी.एड्.ला असतांना विद्यार्थ्यी संसद सचिव म्हणून कार्यकाळ गाजवून सोडला. प्रतिभा निकेतन महाविद्यालय व पीपल्स कॉलेज नांदेड येथून एम.ए.मराठी,एम.ए.इतिहास, नंतर बी.एड्.,बी.लिब, जि.डी.सी.ॲड ए.अशा विविध उच्च पदव्या घेऊन त्यांनी आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली.सख्खे चुलते माजी सरपंच कै.संभाजी पाटील पवार, मेव्हणे मा.सरपंच दिगांबर पाटील डिकळे,माजी आमदार रोहिदासजी चव्हाण,माजी नगराध्यक्षा सौ.आशाताई रोहिदास चव्हाण यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्याला त्यांनी सहवासातून अगदी जवळून पाहिले व त्यांचा आदर्श समोर ठेवला.त्यांच्या अर्धांगिनी उषाताई पवार उच्च शिक्षित असल्यामुळे लग्नानंतर सन २००३ पासून त्यांनी व कुटुंबियांनी वेळोवेळी भक्कमपणे शिवराज पाटील पवार यांना साथही दिली.म्हणून समाजात काम करताना निःपक्षपातीपणे, निस्वार्थीपणे,सर्वधर्मसमभावतेने कार्य करण्याचे ठरवले.
प्रथमतः त्यांनी २००५ मध्ये नेहरू युवा केंद्र नांदेड कडून लोहा तालुक्यासाठी राष्ट्रीय सेवा कर्मी म्हणून जिल्हा समन्वयक चंदा रावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले.तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, शिबिरांचे आयोजन करून व ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध मेळावे आयोजित करून युवक,शेतकरी यांना न्याय मिळवून दिला.तत्पुर्वी तत्कालीन आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोहा येथे कार्यरत असतांना तालुक्यातील अनेक शेतकरी,कष्टकरी, सामान्य, गोरगरीब,राजकिय पुढारी,बैंकेशी निगडित असलेला तालुक्यातील प्रशासनातील कर्मचारी वर्ग याची सेवा करण्याचे सलग पाच ते सहा वर्षे भाग्य लाभले.बैंक डबघाईस आल्यामुळे सदरील कर्मचारी भरती रद्द करण्यात आली.
नंतर लोहा न्यायालयात सरकारी वकील बी.एम.लोमटे यांच्या आग्रहाखातर सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोहा तालुका विधी सेवा प्राधिकरण वर विविध सामाजिक प्रश्न हाताळत, लोकन्यायालयात अनेक तडजोडी करत अनेक प्रकरणं मिटवत तालुक्यातील आयोजित मोफत कायदेविषयक शिबिराला भरपूर वेळ देत उल्लेखनिय प्रशंसनीय कार्य केले.स्वयं शिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजाभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याची जबाबदारी घेऊन महिला बचत गट, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती,सौर ऊर्जा,सखी मेळावे, व्यसन मुक्ती असे उपक्रम राबवत या राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संस्थेत करत तालुक्यात वेगळी छाप पाडली.अशा सामाजिक कार्याची नोंद करत त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील बचत गटांना तत्कालीन विस्ताराधिकारी एस.एन.सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात प्रशिक्षण देत तालुका पिंजुन काढला.
सामाजिक कार्य करत असतांनाच प्रेरक म्हणून त्यांची पारडी ग्रामपंचायतला इसवी सन २०११ला गुणवत्ता बघून निवड झाली.अत्यल्प मानधन असल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळा असा प्रश्न निर्माण झाला ते कुठेतरी काम करतांना या ग्रामीण भागात काम करणाऱ्या प्रेरकांना मानधन मिळाले लवकर वेळेवर मिळाले पाहिजे, ही हा प्रश्न घेऊन ते दिल्ली पर्यंत पोहोचले संसदेवर सलग तिन वर्षे हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला. मुंबईच्या मंत्रालयावरही मोर्चे काढले, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे येथेही मोर्चे, आंदोलने केली.जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर, जिल्हा परिषदेवर मोर्चा, उपोषणे, आंदोलने काढली आणि आपलं उग्र आंदोलन त्यांनी चालू ठेवून प्रशासनाला जेरीला आणण्याचं काम केलं.तत्कालीन केंद्र व राज्य शासनाला वेळोवेळी हादरून सोडले.या वेळी जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख,विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून अनेक प्रकरणे मार्गी लावली.तत्कालीन शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे मैडम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विनोद जाधव सह अन्य जिल्हाशिक्षणाधिकारी, जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या शब्दावर अनेक प्रेरकांना न्यायही दिला.
शिवराजने सतत जनतेचे काम करत असताना त्यांनी समाजकार्यात ही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं.निराधारांचे प्रश्न, विधवा महिलांचे प्रश्न याचबरोबर गावातील, खेड्यापाड्यांतील वीज, पाणी, घरकुल, निराधारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कटाक्षाने फोन आलेल्या त्या संबंधित नागरिकांच्या आजही समोर उपस्थित राहतात असा हा पत्रकार शिवराज पाटील पवार आहे.सन २०१९ ला स्वराज्य २४तास, राजमुद्रा लाईव्ह न्युज,महा २४ न्युजच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार च्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले.स्वतः बातम्या शोधून समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत राहिले.जातिवाद धर्मपंथ कधीही त्यांनी बघितलेला नाही.यानंतर त्यांनी दैनिक हिंदूसम्राट या दैनिकासाठी लोहा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत असताना नंतर ते दैनिक वतनवाला या दैनिकांमध्ये तालुका प्रतिनिधी मधून कार्यान्वित झाले या वृत्तपत्रात सुद्धा त्यांनी समाजातील उपस्थित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केला.
कोणताही सामाजिक प्रश्न असो राजकीय असो त्यांच्याजवळ आला कि लिहिल्याशिवाय राहत नाहीत हा त्यांचा नियम आहे. शिवराज ने आतापर्यंत हाती घेतलेले राष्ट्रीय महामार्गाचे प्रयत्न प्रश्न असतील किंवा विविध विकासात्मक प्रश्न असतील ते लिखाणाच्या माध्यमातून मार्गी नेलेत याबद्दल शंका नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना सत्य बातम्या लिहिण्यात आल्यामुळे, अन्यायाविरुद्ध वास्तव लिखाण केल्यामुळे अनेक वेळा जाणिवपूर्वक पत्रकारावर हल्ले होतात यासाठी त्यांनी पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नावाची हि राज्यभरातील नावाजलेल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी संघटना लोहा येथे २०२० मध्ये शाखा स्थापन केली. त्या संघटनेची लोहा तालुका अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली हे करत असताना पत्रकारांच्या हिताचे काम त्यांनी करतांना डी.टि.आंबेगावे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी लोहा येथील शासकीय विश्रामगृहात नावाजलेल्या दैनिकांच्या जेष्ठ पत्रकारांनी त्यांच्या टिमसह फेरनिवडीची माळ शिवराज पाटील पवार यांच्या गळ्यात घातली. समाजातील अन्य प्रश्नांसह राष्ट्र पुरूष, महामानवांच्या जयंत्या, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण, उत्सवातील उपक्रम हिरीरीने पुढाकार घेऊन राबवत असतात.यामुळेच त्यांना मराठा सेवा संघाचे लोहा तालुका कार्याध्यक्ष पदी ५ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह लोहा येथे मान्यवरांसह विठू भाऊ चव्हाण,बा.पु.गायकर, श्याम पाटील सह सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच त्यांच्या पत्रकारीतेतील कार्याची दखल घेऊन त्यांना २०२१-२२ चा सरपंच सेवा संघाचा २३ डिसेंबर २०२१ रोजी “राज्य स्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार” माऊली सभागृह अहमदनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील नावाजलेले जेष्ठ साहित्यिक,जेष्ठ पत्रकार त्यांचे शैक्षणिक गुरूवर्य अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील,दैनिक वतनवाला चे कार्यकारी संपादक दत्ताभाऊ शेंबाळे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे चे सेवानिवृत अधिकारी बी.एन.सोनटक्के यांची वेळोवेळी सल्लामसलत करत असतात.यापुढेही लवकरच पत्रकारांच्या घरकुलाचे प्रश्न ते निकाली काढणार आहेत.लोहा येथे अद्यावत पत्रकार भवन नवीन बांधकाम करण्यासाठी पाठपुरावा अंतिम टप्प्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकारांच्या प्रश्नासाठी सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिली.
या संयमी, उच्च शिक्षित, अन्यायाविरुद्ध लढणारा, संघर्षयात्री आणि उपेक्षितांना न्याय देणारा, पत्रकारीतेतील निर्भिड,निःपक्षपातीअशा कर्तुत्ववान गुणी पत्रकार शिवराज पाटील पवार यांना तमाम चाहत्यांकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
जेष्ठ पत्रकार
साहेबराव सोनकांबळे
एम.ए.मराठी,एम.ए.इतिहास,बी.जे.,एम.जे.,एम.फिल.(पत्रकारिता आणि जनसंवाद),बी.एड्.