
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहराचे भुमीपुत्र नांदेड येथील जलसंपदा विभागाचे कर्तव्यदक्ष कनिष्ठ अभियंता वसंत व्यंकटराव कळसकर हे ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर दिनांक ३०जून २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता वसंत व्यंकटराव कळसकर हे जलसंपदा विभागा मध्ये २ एप्रिल १९८५ रोजी पैठण येथे नौकरीस रूजू झाले होते.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत जलसंपदा विभागा मध्ये उत्कृष्ट सेवा बजावली शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचे असलेले वसंत कळसकर यांनी आपल्या कार्याचा ठसा जलसंपदा विभागात नौकरी करताना उमटविला शासन – प्रशासन व शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या कामास त्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी आपल्या ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा काळात पैठण, गंगाखेड,परभणी व नांदेड येथे सेवा करून ते नांदेड येथील जलसंपदा विभाग उध्र्व पे. प्र. विभाग नांदेड येथून दि.३०जून २०२२ रोजी कनिष्ठ अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांनी जलसंपदा विभागा मध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल व सेवा निवृत्ती बदल त्यांचा जलसंपदा विभागाच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला व वसंत कळसकर यांचा भव्य नागरी सत्कार जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता. एक.बी. बिराजदार, उप कार्यकारी अभियंता एस.डी. पवार, सहाय्यक अभियंता ईश्वरे यांच्या सहीत कार्यालयातील सर्व कर्मचारी बंधू , भगिनी यांनी केले.