
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
गेल्या आठ वर्षातील मोदी सरकारचे यशस्वी निर्णय आणि उल्लेखनीय योजनांच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपा कार्यालयात मा. जगदीश मुळीक हस्ते करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या भव्य प्रदर्शनात देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आठ वर्षात घेतलेले निर्णय आणि राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांचा विकासपट मांडण्यात आला. तसेच यानिमित्ताने रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते.
मा. भा. ज. पा. शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सह संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंनपुरे, बापू मानकर, गणेश कळमकर, निहल घोडके, धनंजय जाधव, प्रशांत हरसूले, विशाल पवार,चंद्रकांत पोटे, प्रतिक देसरडा, दिपक पवार, सुनिल मिश्रा यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.