
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
१ जुलै १९८२ रोजी मा. श्री. संजय शिंदे यांचा शेटफळ हवेली या छोट्याशा खेड्यामध्ये जन्म झाला. घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. व त्यांच्या लहान वयातच त्यांचे वडील सर्जेराव शिंदे यांचे निधन झाले. कुटुंबातील प्रमुख गेल्याने कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु येवढ्या मोठ्या दुखाःतुन स्वतःला सावरत त्यांच्या मातोश्री श्रीमती. हिराबाई सर्जेराव शिंदे यांनी फार मोठ्या जिद्दीने घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी तयारी केली.
संजय शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ हवेली येथे पार पडले. ते शाळेमध्ये जास्त नाही पण त्यातली – त्यात बर्यापैकी हुशार होते. त्यांना शिक्षणा ऐवजी क्रिडा क्षेत्रात जास्त आवड होती.
त्यांचे पुढील शिक्षण माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली येथे पार पडले. माध्यमिक जिवनात त्यांनी शिक्षणाबरोबरच क्रिडाक्षेञामध्ये फार मोठे नाव कमावले होते. दहावीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळाले. आता पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोणत्या तरी काॅलेज मध्ये एडमिशन घेण्याचे , घरची परिस्थिती हालाकिची असल्याने फार मोठे आवाहन होते. परंतु त्यांच्या मातोश्रीनी तडजोड करून त्यांना इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला.
येथूनच खरा संघर्षमय जिवनाचा प्रवास चालू झाला.
काॅलेज जीवनामध्ये त्यांनी शिक्षणाऐवजी क्रिडा क्षेत्रात जास्त लक्ष देऊन उल्लेखनीय कामगिरी करत तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आपले व काॅलेज चे नाव राज्य स्थरावर पोहोचवले. यासाठी त्यांना मा. श्री.प्रा. बाळासाहेब खटके सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हे जीवन जगत असताना त्यांना अनेक जीवाभावाचे साथीदार भेटले त्यामध्ये प्रामुख्याने राहूलजी मखरे, माणिक(आबा) भोंग, भारत चावले, किशोर शिंदे,माऊली निंबाळकर, रमेश जाधव,नंदकिशोर शिंदे, गणेश चव्हाण, श्रेयस नलावडे,नंदकुमार चव्हाण, अभिजित साठे, गणेश नवले , संदेश वारद,पंकज शिंदे, संतोष शिंदे, वाल्मिक दणाणे,शिवाजी आरडे, आलम मुलाणी, किशोर ढोबळे, दत्तु चव्हाण, अनिल मोरे, प्रदिप काळे, रविंद्र निरगुडे,शंकर काळे, हरिदास शिंदे, शरद शिंदे, दत्तु मोरे, सुनिल शिंदे, अतुल येवले, जयदीप जाधव, गणेश निंबाळकर,विजय धाईंजे, दिपक सावंत, सचिन जाधव, शहाजी जगदाळे,नंदकिशोर पवार, सुभाष चव्हाण, अतुल आरडे, नितीन जाधव, अमोल जाधव, लाला चव्हाण हे आहेत.
नंतर त्यांना हळू हळू राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्याची इच्छा वाटू लागली. हि इच्छा त्यांनी सर्व साथीदारांना बोलवून व्यक्त केली. आणि अभिमानाने सांगावसं वाटते की हि इच्छा सर्व साथीदारांनी स्वीकारली. व शेटफळ हवेली मध्ये इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख मा. श्री. विशालदादा बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची शाखा काढण्याचे ठरवले गेले.
तो सोनेरी दिवस १३ एप्रिल २००३ ठरलवला गेला. हि बातमी तालुक्यामध्ये वार्यासारखी पसरली. आणि एकच चर्चा रंगू लागली. कार्यक्रमाची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली .
त्यावेळचे पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख मा. श्री. बाबासाहेब धुमाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शाखा प्रमुखाची जबाबदारी मा. श्री. संजय शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेऊन सोबतीला किशोर शिंदे, गणेश नवले, विजय धाईंजे, वाल्मिक दणाणे, व गणेश चव्हाण यांना घेत राजकीय क्षेत्रात जोरदार एंट्री केली . हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा शाखा ओपनिंग चा झाला होता.
त्यांनी राजकारणा बरोबर सामाजिक कार्यात जास्त भर देत अनेक गरीब व गरजेवंत मुलांना शैक्षणिक क्षेत्रात सर्व प्रकारच्या अनेक ज्या पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले. व ते तितक्याच ताकदीने पार पाडले. त्यामुळे ते थोड्याच दिवसात सर्वांचे लाडके झाले. आणि सर्वजण त्यांना आदराने मामा बोलु लागले.
त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर भरवणे , जि.प.शाळेतील लहान मुलांना गणवेश वाटणे , वह्या पुस्तक पेन वाटणे,संक्रातीला तिळगूळ वाटणे, मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणे,असे अनेक सामाजिक कार्यक्रम घेऊन त्यामध्ये सर्व समाजातील युवकांना बरोबर घेऊन अनेक कार्यक्रम घेतले. गोरगरिबांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली. पक्षामध्ये त्यांचा दबदबा वाढत चालला होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांनपासून ते जिल्हा व राज्य लेवल च्या नेत्यांन बरोबर जनसंपर्क फार मोठ्या प्रमाणात वाढला होता.
२००४ साली आम्ही लहान होतो. म्हणजेच मतदानाचा अधिकारही नव्हता. अशा वेळी शेटफळ हवेली ग्रामपंचायत निवडणूक लागली होती आणि प्रस्थापितांच्या विरूद्ध काहीतरी करायचं असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. उमेदवार मिळत नव्हते आणि बंड करायचे ठरविले होते. त्या वेळी रात्री १ वाजता स्थानिक विकास आघाडीचे काही नेते व संजय मामा शिंदे यांच्या मध्ये बैठक झाली व युती करण्यात आली होती . आणि राजकारणातील पहिले पाऊल टाकले, त्यात त्यांना अपयश आले, परंतु त्या दिवसापासून खर्या अर्थाने राजकीय जीवनाला सुरूवात झाली. त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या, या वेळी पतित पावन संघटनेतील काही नेत्यांना शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश दिला गेला पंरतु हा पक्ष प्रवेश देताना इंदापूर तालुक्यातील कोणत्याही निष्ठावंत शिवसैनिकांना विचारात घेतले नाही. या वेळी शिवसैनिकांनी आपली नाराजी वरिष्ठांना व्यक्त केली,वरिष्ठांनी सर्व शिवसैनिकांनची मनधरणी केली आणि सर्वांना पुन्हा एकदा सक्रिय होण्यासाठी सांगितले. नंतर २००४ ची विधानसभा निवडणुक लागली इंदापूर ची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. जागा शिवसेना लढवत होती पण त्याचे सर्व नेतॄत्व राष्ट्रवादी मधील काही ठराविक नेते करत होते या वेळी ही निष्ठावंत शिवसैनिकांना विचारात घेतले नाही यामुळे संजय मामांन सह इतर शिवसैनिक नाराज झाले होते, या वेळी संजय (मामा) शिंदे यांच्या निवासस्थानी तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक झाली पण या वेळी संजय मामांनी विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवाराला मदत न करण्याचा निर्णय घेतला .
त्यावेळी इंदापूर तालुका विकास आघाडी मधुन मा. श्री. हर्षवर्धन पाटील साहेब हे निवडणूक लढवीत होते. भाऊ प्रचार करण्यासाठी शेटफळ हवेली मध्ये आले असताना मा. श्री. संजय (मामा) शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांना विधानसभा निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. व संजय शिंदे यांनी त्यावेळी जाहिर पाठिंबा दिला. भाऊनां शेटफळ हवेली सह पंचक्रोशीमधून फार मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. भाऊंनी संजय मामांचे आभार मानुन त्यांना विकास आघाडीमध्ये येऊन काम करा, तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही देऊ असे बोलले.
काही दिवस असेच गेल्या नंतर संजय मामा शिंदे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून इंदापूर तालुका विकास आघाडी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांन सह मा. ना. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी संजय मामा यांच्यावरती विश्वास टाकून स्थानिक पातळीवर बर्याच जबाबदार्या दिल्या होत्या आणि त्या सर्व जबाबदार्या त्यांनी यशस्वी पार पाडल्या. व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू लागले.
संजय (मामा) शिंदे यांनी आपल्या भाषा शैलीवर बर्याच गोष्टी हासील करत कामाबरोबर आपले फ्रेंड सर्कल फार मोठ्या प्रमाणात वाढवले होते. पुन्हा एकदा सन २००९ साली शेटफळ हवेली ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती. आणि सत्तेधाराच्यां विरूद्ध सर्व विरोधक पेटून उठले होते. विरोधक भरपूर होते पण एकत्रित येऊन लढण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यामुळे सत्ताधारी विरूद्ध दोन स्वतंत्र पॅनल निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते, निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली, युवकांचे आदर्श व्यक्तीमत्व असलेले व राजकारणामध्ये अनुभवी असलेले मा. श्री. शंकर (बापू) शिंदे व संजय (मामा) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जय काळभैरवनाथ पॅनल निवडणूक लढवित होता. सर्व उमेदवार उभे केले होते. सर्व कार्यकर्त्यांनी रान करून २० वर्षे सत्तेवर असणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा ६-३ असा दणदणीत पराभव केला. आणि प्रथमच ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवला सर्व विजयी उमेदवारांचे मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी हार्दिक अभिनंदन केले. नंतर भाऊंच्या माध्यमातून शेटफळ हवेली मध्ये जवळ जवळ १ कोटी पेक्षा जास्त रुपयांची विकास कामे करण्यात आली.
नंतर संजय (मामा) शिंदे यांनी शेटफळ हवेली मध्ये मा. श्री. शंकर (बापू) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवर्धन ग्रुपची स्थापना केली . शंकर बापूनीं ग्रुपसाठी खुप सहकार्य केले. राजवर्धन ग्रुपच्या वतीने शेटफळ हवेली मध्ये भरपूर सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. तेव्हापासून ते आजपर्यंत या ग्रुपची जी यशस्वी वाटचाल सुरू आहे ती फक्त आणि फक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजय (मामा) शिंदे यांच्यामुळेच आहे. हे कधीही विसरता येणार नाही.
मामांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी भरपूर प्रयत्न केले पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत, व होणारही नाहीत.
आम्हा सर्व कार्यकर्त्यांना संजय मामाच्यां कार्याचा सार्थ अभिमान आहे.
आमच्या मामांची घोडदौड अशीच सुरू राहावी म्हणून श्री भैरवनाथाला साकडे घालतो .आणि आमच्या संजय मामांना पुढील राजकीय जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा देतो .
कोणत्याही क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. राजकीय क्षेत्रात आपल्या जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशोशिखरावर पोहोचलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे शेटफळ हवेलीचे राजवर्धन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा श्री संजय (मामा) शिंदे होत. गेल्या २५ पेक्षा अधिक वर्षे राजकारणामध्ये सक्रिय असलेले मा श्री संजय (मामा) शिंदे यांची ओळख संपूर्ण तालुकाभर धडाडी असलेला,प्रभावी वक्तृत्वशैली असणारा आणि कार्यकर्त्यांशी जीवाभावाचे संबंध जपणारा नेता अशी राहिलेली आहे. संपूर्ण पंचक्रोशीत कानाकोपर्यात मामांना माणनारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
मामा हे स्वत: पद,प्रतिष्ठा,पैसा यापेक्षाही एक कार्यकर्ता असल्याची भावना नेहमी जपत आलेले आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या सामान्य कार्यकर्ता जोडण्याच्या कौशल्यामुळेच आज त्यांनी हजारो मित्र जोडले आहेत . शेटफळ आणि पंचक्रोशीतच सर्वसामान्य माणसांच्या सुख-दु:खा मध्ये धावून जाणारा नेता सामान्य लोकांनसोबत असणारा देवदूत अशी ओळख आज त्यांनी निर्माण केलेली आहे.
मी केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झालो,त्यामुळेच माझे कार्यकर्ते माझे जीव की प्राण आहेत ,अशी जाहीर भुमिका त्यांनी अनेकदा मांडलेली आहे. सर्वांवर प्रेम करणारा,सर्वांना आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारा सक्रिय असलेला कार्यकर्ता ते नेता हा त्यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरलेला आहे. भूतकाळातील अत्यंत सामान्य परिस्थितीचे अनुभव गाठीशी असल्यामुळे कायम जमिनीवर असलेला नेता म्हणून कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात. शून्यातून स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यामध्ये त्यांनी घेतलेली अपार मेहनत विसरता येणार नाही. तळागाळातील माणसांचे प्रश्न सुटले पाहिजेत; त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडले पाहिजे; त्यांना अधिक अधिक सुविधायुक्त जीवन उपभोगायला मिळाले पाहिजे यासाठी ध्यास घेतलेला नेता अशी त्यांची ओळख आज सर्व सामान्य जेनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
सातत्याने ग्रामीण भागातील शेतकर्याचे,कामगारांचे,कष्टकर्यांचे,स्त्रियांचे प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांनवरती शब्दांच्या माध्यमातून हल्ला चढविणारा नेता अशी मामांची ओळख राहिलेली आहे.
त्यामुळेच त्यांचे संपूर्ण तालुक्यामध्ये चाहते आहेत . आपल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला नावानिशी ओळखून भावनांचा आणि मागण्यांचा आदर करून त्यांच्यासाठी जे जे उत्तम करता येईल ते ते करण्यासाठी धडपडणारानेता असल्यामुळे ते सर्वसामान्यांचे नेते ठरलेले आहेत. असे आवर्जून म्हणावे लागते.
💐💐💐💐💐💐💐
वाढदिवस विशेष
आपल्या वक्तृत्व व कर्तृत्वावर भर देत राजकारणाबरोबर समाजकारणही जपण्यात यशस्वी झालेले युवा नेते संजय (मामा) शिंदे यांची ओळख ही एक कर्तृत्ववान नेता म्हणून झाली आहे.
शेटफळ हवेली मध्येच नव्हे तर, पंचक्रोशीत त्यांच्या कर्तृत्वाचा बोलबाला झाल्याचे पंचक्रोशीतील नेत्यांनी मान्य केले आहे . निश्चितच अशा कर्तृत्व व सामाजिक दूरदृष्टी असणार्या नेत्यांच्या प्रयोगशील संकल्पनेतून शेटफळ हवेली गावाचा सार्वत्रिक विकासात्मक कायापालट होऊ शकतो, याची खात्री आता तळागाळातील जनतेलाही पटली आहे.
स्वाभाविकच मग सार्वजनिक विकासाची आस लागलेल्या शेटफळ हवेलीला पुन्हा जुने, त्यांच्या हक्काचे चांगले दिवस परत आणण्यासाठी सामाजिक विडा उचलणाऱ्या मा. श्री. संजय (मामा) शिंदे यांचा आज ४० वा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्ताने …..
संजय(मामा) शिंदे हे मुळातच दूरदृष्टी आणि विकासात्मक प्रयोगशील असं आगळं वेगळं व्यक्तीमत्व. त्यामुळे जनसामान्यांसाठी संजय (मामा) शिंदे हे स्वाभाविकच सर्वच पातळ्यांवर प्रभावी नेता म्हणूनच यशस्वी ठरले. शेटफळ च्या नैसर्गिक, भौगोलिक व राजकीय गटातटाच्या परिस्थितीवर मात करत इथला सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी पावले उचलली आहेत. मुळातच संस्कारी, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा समृद्ध असणाऱ्या नेत्यावर जी – जी राजकीय, सामाजिक जबाबदारी पडली, ती प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
हे करत असताना अगदी पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते, कामगार असो किंवा मालक अथवा पुरुष असो किंवा महिला अगदी अबालवृध्दांचाही सन्मान करणारा नेता म्हणून त्यांची ओळख ही निश्चितच त्यांच्या जीवनातील यशाचे खरे टाॅनिक मानले जाते.
मुळातच जे सत्य आणि शक्य आहे, तेच बोलून नव्हे तर करून दाखविणारा नेता म्हणजे संजय (मामा) शिंदे त्यांना स्वकर्तृत्वावर खाञी असल्याने त्यांनी कधीही पोकळ घोषणा, भावनिक आवाहने, पूर्वजांच्या नावावर राजकारण करण्याचा अथवा सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. ज्याप्रमाणे त्यांच्या नावात जय आहे, त्याच पध्दतीचा त्यांची राजकीय अथवा सामाजिक वाटचालही असल्याचे नेहमीच पहायला मिळते. त्यामुळे बोलबच्चन, पोपटपंची करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून आपल्या कामाचे प्रगतीपुस्तक घेऊन ते जनता जनार्दनाच्या दारात जातात. स्वाभाविकच त्यांनी यापूर्वी अशी कित्येक कामे करून मिळविलेला नावलौकिक जगजाहीर आहे.
याशिवाय राजकीय दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या शेटफळ हवेली ग्रामपंचायतच्या २०१९ च्या निवडणुकीत कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ पणे सर्व सामान्य जनतेच्या कामासाठी विरोधकांच्या ताब्यात असणारी शेटफळ हवेली ग्रामपंचायत पुन्हा एकदा चांगल्या लोकांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी संजय (मामा) शिंदे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबरीला घेऊन कोणालाही विश्वास बसणार नाही असे घवघवीत यश मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलुन खऱ्या अर्थाने ते किंगमेकर बनले आहेत.
अशा या दिलदार व्यक्तीमत्व असणाऱ्या मा. श्री. संजय (मामा) शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!
शब्दांकन:- बापूसाहेब बोराटे
दैनिक चालु वार्ता इंदापूर तालुका प्रतिनिधी
सरचिटणीस इंदापूर तालुका युवक काँग्रेस,
कट्टर समर्थक संजय (मामा) शिंदे
८६००२०११८७