
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील राज्यमार्ग 216 महेबुबखेडा ते शंकरपूर अर्धवट राहीलेल्या रस्ता दुरूस्ती साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विभागिय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला यश मिळाले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका सचिव शिवाजी गायकवाड यांच्या सततच्या पाठपुरावा व आंदोलने करूनही विषय मार्गी लागत नसल्यामुळे अखेर दि 27.6.2022 रोजी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसर्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी पञ देत. 20 लाखाच्या नविन रस्ता दुरूस्तीसाठी मंजुरी व तांत्रिक मान्यता देत निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे लेखी देऊन आंदोलनापासुन परावृत्त होण्याची विनंती करण्यात आली.
महेबुबखेडा, आगाठाण, भागाठाण, शंकरपूर, काटेपिंपळगाव,सिरेसायगाव, गोपाळवाडी, रोटस्थळ,खडकवाघलगाव व इतर गावांना लासूर -स्टेशन बाजारपेठेला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे.काही गावच्या शेतकरी, नागरीक,विद्यार्थ्यांना या खराब रस्तामुळे खुप मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
या आंदोलनात प्रहारचे ज्ञानेश्वर तोडकर यांनी सहभाग घेत व सामाजिक कार्यकर्ते विजय शिनगारे,नानासाहेब महांकाळे यांनी पाठींबा दिला.
प्रतिक्रीया–
प्रहार च्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला यश आले आहे. महेबुबखेडा ते शंकरपूर या रस्त्याची आता लवकरच दुरूस्ती होईल.20 लाखाच्या तांत्रिक मान्यतेसह निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
या दुरूस्ती मुळे शेतकरी ,नागरिक व विद्यार्थ्याची मोठी गैरसोय टळणार आहे.लासूर स्टेशनचा प्रवास आता सोपा होईल.
–शिवाजी गायकवाड
(माजी तालुका सचिव प्रहार, गंगापूर)