
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
फटाक्यांच्या आतिषबाजीत केले नामकरनाचे स्वागत !
गंगापूर
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर उत्तराधिकारी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगर करावे अशी लोकशाहीच्या माध्यमातून आग्रह मागणी धरणारी विशेष मोहीम सलग चार महिने रथयात्रेसह राबविली. आणि बजाज नगर येथे लक्षवेधी स्वरूपात ‘शंभू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.आता औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर असे झाल्याने जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा करून स्वागत करण्यात आले.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर करावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी होती.त्यासाठी भक्त परिवाराने शासनाला वर्षानुवर्ष पत्रव्यवहारही केले होते. कुठल्याही परिस्थितीत संभाजी नगर असे नामकरण करावे असा आग्रह धरणारी मोहीम लोकशाहीच्या माध्यमातून भक्त परिवाराने नुकतीच राबविण्यात आली होती.सलग चार महिने जनजागृती व रथयात्रेसह विशेष मोहीम यावेळी भक्त परिवाराच्या वतीने राबविण्यात आली होती.महाराष्ट्र ही संत आणि शूरवीरांची भूमी आहे.त्यांच्या त्याग,आणि बलिदानाची भूमी आहे.या भूमीला आणि तेथील जिल्ह्याला शूरवीरांचे नावेच द्यायला हवीत.असा लोकशाहीच्या माध्यमातून आग्रह धरणारी विशेष मोहीम निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर उत्तराधिकारी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने गेल्या चार महिन्यांपासून जय बाबाजी भक्त परिवार आणि धर्मयोद्धा संघाच्या वतीने राबविण्यात आली. शंभुराजेंना इतिहासातील सर्वात मोठी आदरांजली वाहणाऱ्या या विशेष मोहिमेचे आयोजन भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.याबरोबरच हजारो भाविकांचा सहभाग असलेला भव्य आणि लक्षवेधी ‘शंभू मेळावा’ बजाज नगर येथे आयोजित करण्यात आला.मेळाव्यास अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची विशेष मार्गदर्शन केले होते.आता औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर झाल्याने जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राजधानी आश्रम वेरूळसह विविध आश्रम परिसरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा करत स्वागत करण्यात आले.