
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
सिंधुताई गेल्या म्हणून काय झाल अनाथांचा वाली अजूनही जिवंत आहे
हे पालघर जिल्ह्यातील समाज कार्यकर्त्यांनी दाखवून दिल आहे
जव्हार-२९ जून, जव्हार येथील न्याहाळे तळ्याचापाडा मध्ये दोन अनाथ बालके सचिन गोविंद व कामिनी गोविंद ही भावंडे एका झोपडीत राहतात ते कसे बसे आपला उदरनिर्वाह करतात. हे शेजारील गावातील एक सुशिक्षित युवक संतोषभाऊ गोविंद याच्या निदर्शनास आले त्यांनतर त्यांनी सोशल मीडिया च्या मध्यातून लोकांपर्यंत त्यांच्या मदतीसाठी आव्हान केले.
त्याला प्रतिसाद देत आदिवासी क्रांती दलाचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटकर साहेब यांनी आपल्या संघटनेच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचून मदत केली. त्यांना जीवनावश्यक वस्तू, कपडे, पायातील चप्पल, शैक्षणिक साहित्य, दोन महिने पुरेल इतके किराणा सामान सामाजिक जाणिवेतून उपलब्ध करून दिले.
सचिन हा 7 वीत शासकीय आश्रमशाळा न्याहाळे येथे शिक्षण घेत असून तो आपडाऊन करत होता तसेच कामिनी ही जिल्हा परिषद शाळेत 5 वीत शिक्षण घेत होती. तात्काळ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार सहायक प्रकल्प अधिकारी मा.विजय मोरे साहेब, सुभाष परदेशी साहेब (शिक्षण) भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यां मुलांचे शासकीय व उच्च माध्यमिक आश्रमशाळा न्याहाळे येथे शालेय प्रवेश व वसतिगृहात राहण्याची सोय करून मदतीचा हात दिला.या कामी शाळेचे मुख्याध्यापक वसंत मस्के सर, अधीक्षक शिंपी सर,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कांबळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष भूषण महाले, युवा जिल्हा उपाध्यक्ष महेश भोये, दामू मौळे सर , मिलिंद बरफ, दीपक गावंढा सर पदाधिकारी उपस्थित होते.