
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:आपल्या घरची परिस्थिती कितीही बिकट असू द्या
जर तुम्हाला तुमच्या जीवनात जन्म देणाऱ्या आई वडिलांचे स्वप्न साकार करुन जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर मोठे ध्येय ठेवून जिद्द, चिकाटी अंगी बाळगून जीवनामध्ये कितीही अपयश आले तरी खचून न जाता जोमाने प्रयत्न करत राहिल्यास निच्छित अधिकारी झाल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन देगलूर उपविभागीय अधिकारी तथा IAS सौ. सौम्य शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
धुप्पा ( शंकरनगर) ता. नायगाव येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. बालाजी बिरादार, उत्तमराव रुमाले यांचा सेवापुर्ती निमित्याने संस्थेच्या वतीने गौरव व कृतज्ञता सोहळा आणि दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुवारी ३० जुन रोजी पार पडला याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून IAS अधिकारी सौ.सौम्य शर्मा यांनी बोलत होत्या.या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून स्वच्छता दुत माधवरावजी पाटील शेळगावकर हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मोहनराव पा.धुप्पेकर, जा नागरिक गणपतराव पाटील, विठ्ठलराव पाटील, प्राचार्य संजय
कर्मयोगी कै. शहाजी पाटील शेळगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संस्था व विद्यालयतर्फे सर्व मान्यवरांच्या हस्ते बालाजी बिराजदार व उत्तम रुमाले यांच्या सपत्नीक भेटवस्तू, शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा मोत्यांची माळ आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करीत घडलेल्या बिराजदार आणि रुमाले यांचे जीवन संघर्षमय राहिले.
मात्र येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला संधी मानून त्यावर मात करून संत ज्ञानेश्वर या शैक्षणिक संस्थेने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे संगोपन करीत त्याचे वटवृक्ष फुलाविल्याचे श्रेय या दोन्ही शिक्षकांसह गुणवान सर्वंच शिक्षकांकडे जाते असे गौरमय उदगार कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर यांनी सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले.
यावेळी पालक, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते,नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक विद्यार्थी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निळकंठ दबडे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी व्यक्त केले.