
दैनिक चालु वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- मानिक सुर्यवंशी
वझरगा ता.देगलूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच श्री राम पेंटस् भावसार चौक,नांदेड चे मालक, श्री. दिगंबरराव किशनराव मुंडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, अनाथआश्रम/वृद्धाश्रममध्ये जाऊन रोख स्वरूपात काही देणगी, फळे व मिठाई वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आले, या कार्यक्रमाला वृद्धाश्रमाचे संचालक, श्री वाघमारे साहेब, तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष, श्री.आनंद पावडे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष, श्री.संतोष परळकर साहेब, सहकार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, श्री.सागर डहाळे व आश्रमातील कर्मचारी व निवासी उपस्थित राहुन सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.