
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर तालुक्यातील गंगापूर- भाकसखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमण पदी विवेक पंडीतराव जाधव तर व्हाईस चेअरमणपदी हंसराज गुरुनाथ माळेवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सोसायटीच्या झालेल्या निवडणूकीत नवयुवक सहकार पॅनलचे तेरा पैकी दहा उमेदवार निवडून आले आहेत. सोसायटीचे पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी नुतन संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती.यात चेअरमणपदी सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या नवतरुणाला संधी देण्यात आली असून चेअरमणपदी विवेक पंडीत जाधव व व्हाईस चेअरमणपदी हंसराज गुरुनाथ माळेवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सभेला नुतन संचालक विवेक जाधव,गणेश पटवारी,सुधाकर बिरादार,रामेश्वर बिरादार,हंसराज माळेवाडे,संदिप मोरे,सोजरबाई जाधव,शिवनंदा बिरादार,विजयकुमार बुर्ले,अविनाश गायकवाड आदि उपस्थीत होते. दुय्यम निबंधक बाळासाहेब नांदापूरकर,गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम बिरादार यांनी नुतन चेअरमण व व्हाईस चेअरमणचा सत्कार केला.यावेळी मंडळ अधिकारी पंडीत जाधव, गंगापूरचे उपसरपंच गणेश बिरादार,भाकसखेडचे उपसरपंच अरविंद मोरे,माजी सरपंच श्रीहरी जाधव,नागभूषण बिरादार,किरण पाटील,सुधाकर बिरादार,सुरेश जाधव,माधवराव टेकपुंजे,सतिश मोरे,त्र्यंबक कांबळे,बब्रुवान कांबळे,धनाजी मोरे,परमेश्वर मोरे,रामेश्वर मोरे,दयानंद मोरे,श्याम जाधव,सतिश बुर्ले,दत्ता जाधव,हरीभाऊ जाधव,लक्ष्मण जाधव,चंद्रशेखर देवकत्ते,पंढरी गायकवाड,प्रकाश फावडे आदि उपस्थीत होते
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहूल कलकोटे तर सहायक म्हणून गटसचिव राम बिरादार व दत्ता सुर्यवंशी यांनी काम पाहिले.