
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर :- लोहा तालुक्यातील संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर येथील वरिष्ठ लिपीक श्री. संभाजी रामजी तुप्पेकर नियत वयोमानानुसार ३०/०६/२०२२ रोज गुरुवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त संजय गांधी विद्यालयातील सर्व सहकारी बांधवांनी श्री. संभाजी तुप्पेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बळीराम पाटील प्रार्थमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माधव भोपाळे यांनी तुप्पेकर यांचा बदल विचार मांडले. तसेच संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मामडे एस.एन.अध्यक्षस्थानी होते, प्रा. श्री. शेट्टे सर , श्री. ब्रि. एम. गायकवाड सर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी व कर्मचारी यांनी सेवापुर्ती निमित्ताने व पुढील भावी कार्यासाठी तुप्पेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.