
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-विद्यार्थ्यांनी मिळवलेली गुणवत्ता ही प्राथमिक स्तरावरची आहे. आयूष्यात सोनेरी दिवस आणण्यासाठी अभ्यासाचे नियोजन आणि नियोजनात सातत्य असणे गरजेचे आहे. अभ्यासाचं नियोजन जमलं म्हणजे आयुष्याच नियोजन निश्चितपणे जमेल असा विश्वास यशस्वीनी अभियानच्या राज्य समन्वयक सौ वैशालीताई राहुल मोटे यांनी पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
गुरुवार दिनांक 30 जून 2022 रोजी भूम तालुका पत्रकार संघाच्यावतीने १० वी व १२ वी , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यशस्विनी अभियानच्या राज्य समन्वयक वैशालीताई राहुल मोटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून ध्यान केंद्र हाडोगरीच्या संचालिका सौ अनुष्काताई आदित्य पाटील उपस्थित होत्या.
याशिवाय सौ शुभांगी हेमंत देशमुख . सौ मीराताई आबासाहेब मस्कर . सौ विक्रांती विलास शाळू. सौ मनीषा विनोद नाईकवाडी. सौ सुहासिनी गणेश साठे. तसेच श्रीमती मीनाताई विनायक उपरे. श्रीमती अनिता अर्जुन काळे यांची उपस्थिती होती. दरम्यान ध्यान केंद्र हाडोंग्रीच्या संचालिका सौ अनुष्काताई आदित्य पाटील यांनी मार्गदर्शन करताना शेती परवडत नाही हे चुकीचे असून शेती नियोजनबद्ध पद्धतीने केली तर निश्चितपणे फायदयात राहते. शेती करत असताना विषारी औषधाची फवारणी न करता गावरान पद्धतीच्या फवारणीचा वापर करावा. शेणखताचा वापर करावा तर निश्चितपणे शेतीसुद्धा फायद्यात राहते असा विश्वास त्यांनी दिला.
या कार्यक्रमातून विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याच्या अनुषंगाने विधवा महिलांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान चिन्ह. शाल . पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी सौ राणीतारा राजा प्रशाला भूम. जिल्हा परिषद हायस्कूल भूम . गुरुदेव हायस्कूल भूम. पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू हायस्कूल . बानगंगा हायस्कूल भूम. रवींद्र हायस्कूल भूम व एकरा उर्दू हायस्कूल भूमच्या विद्यार्थ्याबरोबरच महाविद्यालयीन माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश होता.
पत्रकारांच्यावतीने दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गेल्या 18 वर्षापासून सातत्याने घेतला जात आहे. ते सातत्य १९ व्या वर्षीही कायम ठेवत यावर्षी हा कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमासाठी पत्रकार शंकर खामकर . तानाजी सुपेकर . प्रदीप साठे. रोहित चंदनशिवे. नंदकुमार देशमुख आदींनी परिश्रम घेतले.