
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधि -मोहन आखाडे
शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत विविध लाभांच्या योजना राबविण्यात येत असून या योजनेचे लाभार्थी प्रगत शेतकरी यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संवाद साधला गंगापूर तालुक्यातील माळीवडगावचे शेतकरी गोरखनाथ गोरे यांच्या गांडूळ खत व बीज निर्मिती प्रकल्प आणि शेवग्याच्या शेतास भेट दिली यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संपर्क अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार सतीश सोनी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ.किशोर झाडे, यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व गावातील शेतकरी उपस्थित होते.
ओमान सारख्या देशात गांडूळ खताची निर्मिती आणि निर्यात करणाऱ्या गोरखनाथ गोरे यांच्या नवनवीन प्रयोगाची माहिती घेऊन इतर शेतकऱ्याने शासनाच्या विविध योजनेच्या सहकार्याने आर्थिक प्रगती करावी. त्याचप्रमाणे ‘विकेल ते पिकेल’या योजनेप्रमाणे शेतकऱ्याने बाजारपेठेतील मागणीप्रमाणे उत्पादन आणि दर्जा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत आहे. आधुनिक शेती तंत्र, अनुभव आणि तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांना माहित व्हावे यासाठी गोरे यांनी इतर शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ही यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा या गावातील नंदकुमार कराळे यांच्या शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या लाभातून दीड हेक्टर जमिनीवर केशर आंबा फळपीकाच्या लागवडीची पाहणी केली तसेच श्री. कराळे यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधून अंबाफळ निर्यातक्षम दर्जाचे तयार व्हावे, यासाठी योग्य मार्गदर्शन कृषी विभागामार्फत घेण्याचे सूचित केले. आपुलकीच्या संवादातून शेतकऱ्यांना प्रोत्साहान आणि मार्गदर्शन यावेळी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने केले आहे. अशी प्रतिक्रीया शेतकरी कराळे यांनी दिली.
वैजापूर तालुक्यातील पंचायत समिती, सभागृहात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले. महाराजस्व अभियाना अंतर्गत मोफत सातबारा वाटप, साहित्सासह बी-बियाणे खतं यांचे वाटप जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे एकूण 37 लाभार्थ्यांचे प्रस्तावास मंजूरी देऊन शेतकरी बांधवाना मदत केली याबद्दल वैजापूर महसूल प्रशासनाचे कौतुकही केले. दुर्बल घटकातील महिलांना तसेच अपंग लाभर्थ्यांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. घरकुल आवास योजनेच्या 100 लाभर्थ्यांना पहिल्या हफ्त्याच्या 15 हजार रक्कमेचे वितरण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. उभारी 2.0 या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये पीठाची गिरणी, मोबाईल, स्कूल बॅग व बी-बीयाणे याचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांना संबधित करताना श्री. चव्हाण म्हणाले की जबाबदार नागरिक म्हणून तालुक्यातील सर्व नागरिकांनी स्वत:चे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. तसेच जुन्या पाणी स्त्रोताचे पुर्नरुज्जीवन करुन पाणीपुरवठा सुरुळीत व मुबलक होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना ‘ई’ पीक पाहणी ॲपवर पीकपेऱ्यांची नोंदणी करावी जेणेकरुन अवकाळी पाऊस किंवा इतर पीकाच्या नुकसानीबाबत प्रशासनास अधिकृत माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्यात सहज आणि पारदर्शक पद्धतीने वेळेत पोहोचवता येईल. या कार्यक्रमात बिनशेती वापराचे प्रमाणपत्र व चलनाचे वाटप ही चव्हाण यांनी केले. तालुक्यात अनधिकृतरित्या राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे उभारु नयेत. समितीच्या मान्यतेनंतरच पुतळयासंदर्भात निर्णय घेण्याबाबत उपस्थित नागरिकांना सांगून अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपन करावे असे आवाहनही या कार्यक्रमात सुनील चव्हाण यांनी केले.
यावेळी तहसीलदार राहुल गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी श्री.बिघोत, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, कृषी अधीक्षक अधिकारी तुकाराम मोटे यांच्यासह शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणत उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील देवळी जि.प. शाळेत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून या शाळेच्या आवारात वृक्षरोपण केले. यावेळी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी विजय परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती दिक्षीत, लागवड अधिकारी श्रीमती छाया बाणखेले, यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती भालेराव यांच्या सह सर्व शिक्षण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
वैजापूर तालुक्यातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वैजापूर तालुका प्रशासन व अभिनव फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच मार्गदर्शन करताना म्हणाले की स्वत:मधील क्षमता ओळखून यांचा विकास करावा व क्षमतेप्रमाणे आपल्या करीअरचे क्षेत्र निवडावे. अभ्यासाच्या पद्धतीत बदल करुन चर्चा आणि संवादाने अभ्यास सोपा व सहज होतो यातून आनंद मिळावा अशा पद्धती विद्यार्थ्यांनी अंगिकाऱ्याव्यात. समाजात विविध क्षेत्रात आपले नावलौकिक कमवून उत्तम नागरिक व्हावे. याचबरोबर आई-वडील यांच्या कष्टाचा आदर ठेऊन यश संपादन करण्याच्या शुभेच्छा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
वैजापूर नगरपालिका कार्यालयास भेट व पाहणी
वैजापूर नगरपालिका कार्यालयातील विविध शाखाची पाहणी करुन अभिलेख कक्षास जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कर्मचाऱ्याशी संवाद साधून नवनवीन बदल कार्यापद्धतीत करुन कामकाजात अद्ययावतपणा आणावा, आपल्या क्षमता विकासाबरोबरच ज्ञानाचा कक्षा रुदावंणाऱ्या विविध प्रशिक्षण व उपक्रमाचे आयोजन करुन स्वच्छता आरोग्य, शिक्षण यामध्ये सर्वोत्तम सुविधा नगरपालिकेकडून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी केल्या. नगरपालिकेच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा परदेशी, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, मुख्यधिकारी श्री बिघोत, त्याचप्रमाणे नगरपालिका कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
गतवर्षी नगरपालिका उद्यानात वृक्षरोपन केलेल्या झाडाचा वाढदिवस जिल्हाधिकारी यांनी केक कापून केला. व ते झाड वाढले आहे. हे बघून याबाबत आनंद व्यक्त केला.
वैजापूर तालुक्यातील माळीसागज या गावातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत लाभ घेतलेल्या रमेश पवार या शेतकऱ्याच्या दाळ मिल प्रकल्पास भेट देऊन शेतीस पूरक असलेल्या व्यवसायसाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा कशाप्रकारे श्री.पवार यांना झाला याची संवादातून माहिती घेतली. तसेच शिमला मिर्ची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतास भेट देऊन त्यांना प्रोत्साहान दिले.