
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
===================================
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते उपमुख्यमंत्री झाले आहेत.
===================================
मुंबई : भाजपने पाठिंबा देऊन शिवसेनेचे बंडखोर आमदारांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते उपमुख्यमंत्री झाले आहेत.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून सातत्याने दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या उच्चार केला आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून शेवटपर्यंत सेनेतच राहणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा रंजक प्रवास
शिंदे गटाने बंडाळीची भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात आधीच भूकंप झाला होता.त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. अखेर भाजप आणि शिंदे गटाने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. आणि पत्रकार परिषदेत बोलताना ‘एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील,’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर वर्णी झाले आहेत. रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. एकनाथ शिंदे यांची सध्या राज्यभर नाहीतर देशभर चर्चा पसरली आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या तालमित घडलेले एकनाथ शिंदे मागील अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 2019 साली शिवसेना-भाजप युती तुटली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यासोबत महाविकास सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये शिंदे नगरविकासमंत्री होते.
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच असल्यानं लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गावाला रामराम केलं. आणि ठाण्यात दाखल झाले आहे. ते तिथेच स्थायिक झाले. ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून ११ वीचे शिक्षण पूर्ण केले. अशातच आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. आणि आपल्या नोकरीकडे लक्ष केले.
दरम्यान गेल्या दहा दिवसांपासून शिंदे गटांनी मोठं बंड स्विकारलं. बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला गेले. तेथून काही दिवसांनी गुवाहाटीला गेले.त्यानंतर काल गोव्यात दाखल झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटातील आमदारही भाजपसोबत युती करा असं आवाहन देत होते.
अखेर सरकार स्थापन झालं हे निश्चित झालं आहे. सध्या शिंदे गटात जवळपास 50 इतके आमदार आहेत.
एकनाथ शिंदेची राजकीय कारकीर्द याबाबत अधिक माहिती
– 1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, 3 वर्षे स्थायी समिती सदस्य, 4 वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
– 2004, 2009, 2014, 2019 चार वेळा आमदार.
– 2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते.
– 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्षनेता.
– 5 डिसेंबर 2015 ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री.
तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री.
– ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते.
– नोव्हेंबर 2019 पासून नगरविकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री.
– जून 2022, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी
उद्धव ठाकरेंनी ग्रेसफुली राजीनामा दिला – शरद पवार
मला माहीत नाही आधीच घडलं का ? राज्याच्या विधीमंडळाशी माझा संबंध राहिला नाही. ही तयारी आधीच असल्याशिवाय ते जाणार नाही. इथून सुरत, तिथली व्यवस्था. तिथून गुवाहाटी तिथली व्यवस्था, आणखी गोव्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाही, असेही पवार म्हणाले. एकदा बहुमत असल्यावर त्यावर बाकी काही फार कटकटी करू नये. ग्रेसफुली अक्सेप्ट करावं आणि उद्धव ठाकरेंनी बहुमत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी ग्रेसफुली राजीनामा दिला. ते सत्तेला चिपकून राहिले नाही. ही माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे
शिवसेना संपुष्टात आली का ?
शिवसेना संपुष्टात आली नाही यांवार बोलताना
शरद पवारांनी राजकारणाच्या इतिहासातील बंडखोरीची उदाहरणे दिली. शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. बंड होत असतात. यापूर्वी भुजबळांनी बंड केलं. आमच्या पक्षात आले. काही झालं नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केलं. तेही पराभूत झाले. साधारण शिवसेनेत असं आज झालं नाही. ज्यांनी बंड केलं, त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते. 1981 मध्ये माझ्या नेतृत्वात 67 आमदार निवडून आले. सहा महिन्यांनी निवडणूक झाल्यावर मी सुट्टीला गेलो होतो. दहा दिवसांनी परत आलो. त्यावेळी माझ्यासह सहा लोक राहिले. मी 67 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. मी पाच लोकांचा नेता राहिलो. माझं पदही गेलं. पण त्यानंतर निवडणूक झाली. मला सोडून गेलेल्या सर्वांचा पराभव झाला आणि माझी टीम 73 झाली. पवारांचा अनुभव…
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा.
पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना केली.
लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतीमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीस उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीत २ व ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. (राज्यपालांचे नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश) “आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी असे उपमुख्यमंत्री आहेत.
त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकास कामे, विविध प्रकल्प यांना गती द्यावी लागेल. विविध समाज घटकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. शासन आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत.
लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गतीमान शासन प्रशासन आहे. असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया. मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.