
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते सुमितभैया उत्तमराव वाघ यांच्या हस्ते स्व.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहाराने अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा नेते सुमितभैया वाघ यांनी स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जीवनावर बोलताना त्यांनी केलेले कृषीविषयक धोरण,महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या अनेक सुधारणा याचे महत्व सांगितले तसेच महाराष्ट्रातील हरित क्रांती,रोजगार हमी योजनेत महत्वाची असलेली त्यांची भूमिका यावेळी विशद केली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ,पोलीस निरिक्षक बालाजी मोहिते,ज्येष्ठ नेते लक्ष्मण तिकटे,प्रा.बी डी पवार,सरपंच पंडीत पवार,बिलाल पठाण,सचिन शेटे,समाधान जाधव,नागेश राठोड,सुनिल चव्हाण,अंकुश बोमदरे,गजानन पाटील,मोहन चव्हाण,राजकुमार चव्हाण,माधव चव्हाण,सचिन जाधव,मंगेश आडे,
तानाजी जाधव,किरण जाधव,अनिल राठोड,रुपेश वाघ,रमेश जाधव,शिवाजी जाधव,बालू राठोड,जावेदभाई आदीजण उपस्थित होते