
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच
खासगी शाळा सुरू झाल्या असून त्यात ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही शाळेत शासनाची शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना सर्व मुख्याध्यापकांनी आवश्यक ती काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शालेय पोषण आहार योजनेचे मध्यान्ह भोजनाचे अन्न पदार्थ हे स्वच्छ, चवदार तसेच चांगल्या दर्जाचे देण्याची मागणी छावा संघटनेने निवेदनाव्दारे गटशिक्षणाधिकारी यांना केली आहे.शाळेत विद्यार्थ्यांना दररोज दुपारच्या वेळी मध्यान्ह भोजन म्हणून प्रत्येक दिवशी वेगवेगळे अन्न पदार्थ खाऊ म्हणून दिला जातो, परंतु देण्यात येणारे खाऊ हा शासनाच्या नियमाप्रमाणे दिला जात नाही. सदरील खाऊ हे चवदार नसून त्याची स्वच्छता देखील केली जात नाही. कमी प्रमाणात शिजविले आसल्याने कच्चे राहते. यामुळे शालेय मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परवा बिलोली तालुक्यातील एका खासगी शाळेत या आहाराकडे दुर्लक्ष केल्याने मुलांना विषबाधा झाली. परंतु, सुदैवाने उपचारानंतर मुलांची प्रकृती चांगली झाली. अशी घटना आपल्या तालुक्यातील शाळेत घडू नयेत त लांचे आरोग्य बिघडणार नाही, याकडे मुख्याध्यापकांना काळजी
घेऊन विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शालेय पोषण आहार चवदार तसेच चांगल्या दर्जाचा द्यावा, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांना छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील येताळे, तालुका कार्याध्यक्ष दिगांबर पाटील चोंडीकर यांनी केली आहे.