
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात उपस्थित नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे नेते तथा आष्टूर चे उपसरपंच बाबासाहेब बाबर यांनी लोहा तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, आष्टूर ग्राम पंचायत कार्यालया अंतर्गत दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी लोहा येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल केला असून त्या प्रस्तावाला मंजुरी सहीत जीओटाय झालेले आहे तरी संबंधित कार्यालयातील अनुपस्थित कर्मचाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होऊन ही वृक्ष लागवडीची असल्याच प्रकारची परवानगी मिळाली नसुन जून महिना संपत आलेला असुन संबंधित विभागाकडून या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे दि.२९-६-२०२२ रोजी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून बोलणे झाले असून संबंधित अधिकारी काळे हे पुर्ण प्रभार न मिळाल्यामुळे मला कामकाज करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे अशा पध्दतीचे बोलणे झाले. कार्यालयात एकमेव वनमजूर वाघमारे उपस्थित होते.
तेव्हा या प्रकरणाची लोहा तहसिलदार यांनी चौकशी करून अनुउपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच बाबासाहेब बाबर यांनी लोहा तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.