
दैनिक चालू वार्ता पूणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
30 जून बोपोडी पूणे
पुण्यनगरीच्या मा.उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या सूचविलेल्या विकासनिधीतून प्रभाग क्र.11 मधील *मुक्तिधाम स्मशानभुमी,भाऊ पाटील रोड,बोपोडी,पुणे-20 येथील विविध कामाचे भुमीपूजन व शुभारंभ गुरूवार दि. 30 जून 2022 रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता संपन्न झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे, मोहन गायकवाड यांच्या हस्ते नारळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या भुमीपुजनप्रसंगी मा.उपमहापौर सुनिता वाडेकर, रिपाईं नेते परशुराम वाडेकर, अविनाश कदम, राजेंद्र शिंदे, निलेश वाघमारे, कनिष्ठ अभियंता सुशील मोहिते, गिरी महाराज, जाधव साहेब , समध शेख, दिपक गायकवाड, बाळू मोरे अनिस रोकडे , आप्पासाहेब वाडेकर, प्रमोद शिंदे, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, सुजाताताई कांबळे, शकुंतला बनसोडे, सुमीत गिरी, इत्यादी मान्यवर आणी कर्मचारी उपस्थीत होते.