
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे संतुलन राखा पर्जन्यमान वाढवा हा संदेश देत धावरी येथे शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी महाराष्ट्र कृषीदिन वृक्ष लागवड करून साजरा केला.
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे . झाडे लावले व ते जगविले तर वृक्ष एक फायदे अनेक या प्रमाणे पर्यावरणाचे संतुलन राखणे , उन्हाळ्यात सावली मिळणे, शुद्ध ऑक्सिजन मिळणे , त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी मिळावे पावसाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, नागरिकांनी आपले आद्य कर्तव्य समजून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करावी व लावलेले झाड जगवावे हा संदेश महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी देऊन धावरी येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त लहान बालकांना नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगून लहान बालकाबरोबर वृक्ष लागवड करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला.