दै.चालू वार्ता, विष्णुपुरी सर्कल प्रतिनिधी
बालाजी पाटील गायकवाड
जानापुरी येथील सार्वजनिक विहिर चोरीला गेली असी बातमी काही वर्तमानपत्रांतून प्रसिद्धीस आली. पण तसे काही झालेच नाही.कारण जानापुरीची सार्वजनिक विहिर चोरीला गेलीच नाही. फक्त नजर चुकीने 228 गट नंबर ऐवजी 245 गट नंबर पडला आहे सदरील विहीरीची चौकशीला लोहा पंचायत समितीचे BDO साहेब ,जानापुरी गावचे तलाठी कावळे साहेब, ग्रामसेवक नंदनवनकर साहेब,तसेचJE सकले साहेब, सरपंच प्रतीनिधी गजानन गच्चे , तंटामुक्तीचे अध्यक्ष राजु पाटील येवले, मा.संरपंच त्र्यंबक पाटील कदम यांनी पंचनामा केला व विहीर चोरीला गेलीच नाही असा अहवाल सादर केला.