
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी व देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने बावडा येथे फटाके वाजवून व ग्रामस्थांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
यावेळी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या निधी, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे नियुक्ती व मराठा समाजाचे इतर प्रश्न सोडवण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत अशी इच्छा यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे यांनी व्यक्त केले.