
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- दि : १जुलै २०२२ रोजी हरित क्रांतीचे जनक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नायक साहेब यांची 109 वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी स्व. वसंतरावजी नायक साहेब यांच्या जीवनकार्यावर श्री पवार संजय यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मद्देवाड अवेशकुमार, श्री गुळवे शिवाजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास चव्हाण, उत्तम आडे, सिताराम खांडेकर, दत्ता खांडेकर, शिवाजी जावीर, रवी पवार, मेरबान राठोड, मारोती पवार, अशोक राठोड, अरविंद पवार, चांदु सुरनर, विनोद जावीर आदिंची उपस्थिति होती