
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
मा श्री सुमित भैया उत्तमराव वाघ युवा नेते राष्ट्रवादी यांच्या शुभहस्ते
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे हणमंतवाडी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीचे युवा नेते सुमितभैया उत्तमराव वाघ यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम युवा नेते सुमितभैया वाघ व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांच्या हस्ते स्व.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहाराने अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा नेते सुमितभैया वाघ यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शंकर जाधव,माजी तंटामुक्ती अध्यक्ष अंबादास जाधव,शालेय समितीचे अध्यक्ष माधव चव्हाण,मुख्याध्यापक धोंड सर ,शिक्षीका नंगराळे मँडम,बिलाल पठाण,समाधान जाधव,भोदू जाधव, राजकुमार चव्हाण,बाळू राठोड,भानुदास राठोड,मारुती राठोड,गणेश जाधव,सुशिला शंकर जाधव,सुशिला अशोक जाधव,उषा विजयकुमार जाधव,उषा बाळू जाधव,जावेदभाई आदीजण उपस्थित होते