
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -भरत पवार
कृषी दीना निमित्त गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे यांनी राबविला व्रक्षारोपनाचा स्तुत्य उपकृम
येथे आज कृषी दिना निमित्त श्रीमती चऊत्राबाई व्यंकटी गायकवाड यांना राष्टीय कृषी विकास योजनेमधुन मिळालेल्या नविन विहीरीचे लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.शैलेश वाव्हळे यांच्या हस्ते जलपुजन करुन याठीकाणी वृक्षारोपन करण्यात आले. व आज कृषी दिना निमित पारडी, दगडगाव व तलुक्यात विविध ठीकाणी व्रक्षारोपन करण्यात आले.लोहा तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे यांच्या पुढाकारातुन राष्टीय कृषी विकास योजनेतील नविन विहीरीचे कामे व डा.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील नविन विहीरीचे कामांना गती मीळाली आहे व मागासवर्गीयांसाठीच्या लाभाच्या योजनेंना प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे लाभार्थी समाधा व्यक्त करत आहेत. तसेच कारेगाव येथील चऊत्राबाई गायकवाड यांच्या शासकीय योजनेतील खोदकाम केलेल्या विहीरीला पाणी लागले आसुन आज कृषी दिना निमित्त गटविकिस अधिकिरी शैलेश वाव्हळे यांनी त्यांच्या विहीरीवर जाऊन जलपुजन करुन वृक्षारोपण केल्यामुळे चऊत्राबाई गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, कृषी विस्तार अधिकारी भारती, कृषी विस्तार अधिकारी चोंढे,आंबेडकर नॅशनल कॉग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड, गोपिनाथ गायकवाड, संजय गायकवाड आदी उपस्थीत होते.