
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कलंबर सर्कल -हनुमंत श्रीरामे
कंधार :माळाकोळी ते कंधार हा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता खूप खराब झाला आहे.दक्षिण भारतातील सर्वात मोठी समजली जाणारी माळेगावची यात्रा या यात्रेला दक्षिण भारतातून प्रचंड जनसमुदाय व भाविक भक्त खंडेरायाच्या दर्शनासाठी व व्यापारासाठी येत असतात, महाराष्ट्रातील देगलूर,मुखेड,बिलोली, नायगाव,उमरी,धर्माबाद,मुदखेड व तसेच तेलंगणातील,तामिळनाडूतील, केरळ मधील सर्व भाविक व व्यापारी या रस्त्यानेच येतात;पण कोरोना संकटामुळे दोन वर्षे यात्राच भरली नाही,यात्रा भरली नाही म्हणून यात्रेकरू पण आले नाहीत.त्यामुळे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.रस्त्याची डाग डुगी खड्डे बुजवणे पण दोन वर्षे झाले,झाले नाही आता पावसाळा आला आहे.शाळा पण पूर्णपणे सुरू झालेली आहे.पावसाचे पाणी रस्त्याने वाहत आहे रस्ता पूर्ण उकळून गेलेला आहे.विद्यार्थ्याला खूप मोठी अडचण निर्माण होत आहे.बाबुळगाव ते माळाकोळी पर्यंतचा रस्ता खूपच खराब झाला आहे शाळेला जाणारे विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी,प्रवासी व खंडेरायाच्या दर्शनाला जाणारे भाविक भक्त यांना खूप त्रास होत आहे.त्यामुळे तात्काळ शासनाने याकडे लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करावा ही सर्वांची आग्रहाची नम्र विनंती आहे.