
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर :शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचा वाढदिवस तालुक्यांमध्ये सामाजिक उपकारांनी साजरा करण्यात आला. यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर,महादेव दूध अभिषेक,गरजु विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप, रुग्णांना फळ वाटप, वृक्षरोपण, अशा विविध माध्यमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी देव आधी देव महादेवाला दुग्ध अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली.शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांच्या माध्यमातून परतुर तालुक्यामध्ये विविध जिल्हा परिषद शाळा येथे शाळेचे साहित्य वाटप करण्यात आले व वृक्ष लागवड परतुर तालुक्यामध्ये नेत्र तपासणी व त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून द्यायची जिम्मेदारीशिवसंग्राम तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित सचिन खरात तालुकाध्यक्ष शिवसंग्राम,आबासाहेब बागल, संदीप खवल, अंकुश जाधव, मनीष वाटाणे, भारत राजबिंडे, अमोल राजबिंडे, गणेश सांगुळे आधी तालुका पदाधिकारी उपस्थित होते.