
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
लासुर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्लेट काटा दर कमी करावा. यासाठी आज शुक्रवारी कांदामार्केट मध्ये शेतकऱ्यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनावेळी वैजापूर बाजार समितीप्रमाणे प्लेट काटा दर करावा टॅक्टर ३० रुपये व छोटे वाहन २० रुपये प्रमाणे दर करावे,अशी मागणी प्रास्ताविकातून प्रा.अशोक म्हस्के यांनी केली.
याप्रसंगी आण्णा डमाळे (मा.सरपंच धोंदलगाव), दिलीप आवारे (मनसे किसान सेना जिल्हाध्यक्ष), प्रभाकर जाधव (विभाग प्रमुख) सह अनेक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील पोळ सचिव कचरू रणयेवले,संचालक सुनिल पाखरे, स्वरूपचंद कुकलारे आदी उपस्थित होते.
आंदोलनावेळी प्रा.अशोक म्हस्के, रामनाथ शेलार, अाण्णा डमाळे, हरी तात्या कदम, दिलीप आवारे, पांडुरंग बोरकर, प्रभाकर जाधव, गोपाल कदम, प्रल्हाद कदम, मारुती उबाळे, कारभारी सोनवणे, भाऊसाहेब शेलार, अमोल कदम, अशोक कदम, देविदास म्हस्के, संतोष सोनवणे, मच्छिंद्र म्हस्के, गोपाल रेसवाल, पारसनाथ शेजुळ, अजबराव शेलार, शिवाजी म्हस्के, विष्णू म्हस्के, आदिनाथ त्रिभुवन, रवींद्र वाघ, अमोल वाघ, राहुल सोळस, बाळू वाघ, सतीश ढंगारे, मोतीलाल झाल्टे, कांताराव राऊत, किरण म्हस्के, विजय म्हस्के, बळीराम म्हस्के, अाण्णा झाल्टे, साईनाथ कदम, मुकेश तळेकर, रमेश जाधव, राजू बेल्हेकर, गणेश कदम, आकाश त्रिभुवन, विलास शेलार सह शेकडो शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कर्मचारी, पत्रकार व पोलीस प्रशासन उपस्थित होते.
प्रतिक्रिया :- रवींद्र पाटील पोळ (सभापती, बाजार समिती )9 जुलै 2022 रोजी लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची बैठक घेऊन प्लेट काटा दर कमी करण्याबाबत ठराव करून संबंधित वरिष्ठ कार्यालयाची तात्काळ मंजुरी घेतली जाईल व जो निर्णय घेतला जाईल तो शेतकरी हिताचा घेतला जाईल असे आश्वासन सर्व शेतकऱ्यांना दिले या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन थांबविण्यात आले.