
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
जिल्हा परिषद स्वच्छता मिशन अंतर्गत 1 कोटी 19 लक्ष रुपये अंदाजपत्रक असलेल्या शिरपूर जैन येथील भूमिगत व बंदिस्त नाली बांधकामाची सीईओ वसुमना पंत यांनी वारंवार झालेल्या तक्रारीनुसार दखल घेवून 28 जून रोजी पाहणी केली.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शिरपूरचे भूमिगत व बंदिस्त नाली बांधकाम करण्यात येत आहे.
गावामध्ये सध्या बर्याच ठिकाणी नालीचे बांधकाम करण्यात येत असून, या 1 कोटी 19 लक्ष रुपये अंदाजपत्रक असलेले काम आहे. सदर काम अंदाजपत्रकानुसार व काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असल्याने सदर तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी येथील वार्ड क्रमांक 6 मध्ये चालू असलेल्या नाली बांधकामाची पाहणी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वेले मालेगाव पंचायत समितीचे बीडिओ काळपांडे इतर अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये नली बांधकामाची बाबत चौकशी करण्यात आली. आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी पाहणी दरम्यान वार्ड अंगणवाडी समोरच डम्पिंग ग्राउंड प्रमाणे फार मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला पाहून व सांडपाण्याचे रस्त्यावरून वाहणारे पाणी पाहून ग्राम विकास अधिकारी भागवत भूरकाडे यांची कान उघाडी केली. ताबडतोब सदर ठिकाणी स्वच्छता करण्याचे आदेश देवून अंगणवाडी परिसरात सीसी लावण्याचे व कचरा टाकणार्यावर कारवाई आदेश दिले. तसेच बंदिस्त नालीच्या सुरु असलेल्या कामात योग्य उतार नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलेले होते त्यामुळे अयोग्य होत असलेले काम योग्य प्रकारे करून घेण्याचे संबंधित अभियंत्याना आदेश दिलेत.