दै चालु वार्ता वृत्तसेवा
खेड : नवसाला पावणारी आई करंजूदेवी नवरात्र उत्सव कोवीडचे नियम पाळून उत्सव दिमाखदार साजरा केला गेला, शालेय मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सकाळ सायंकाळ अर्तीचे नियोजन, भजन असे संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र काळात महाराष्ट्र राज्यातील विविध मंडळींनी देवीच दर्शन घेतल, कलियुगातील कर्ण दानशूर श्री नानजी भाई खीमजी भाई ठक्कर (थानावला) राज्याचे गृहमंत्री यांच्या कन्या पूर्वा ताई वळसे पाटील तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती घेण्यात आल्या, किरणाताई वळसे पाटील यांनी मंजूर केलेल्या 15 हजार ली. पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले, देवीचा महिमा अगात असून आरती झाल्यावर रोज 2 हजार लोकांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती, भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत होते. ट्रस्ट चे अध्यक्ष बजरंग पोखरकर व सचिव – सचिन लाडके साहेब कार्याध्यक्ष सुरेश लोहकरे उपाध्यक्ष सचिन गव्हाणे, निलेश रा.पोखरकर, शंकर दादा पोखरकर, विजू अण्णा लोहकरे (तलाठी भाऊसाहेब ) जालिंदर पोखरकर , एकनाथ लाडके, गणेश पोखरकर तसेच त्यांची सर्व टीम /गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुंदर असा नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला, तरुण पोरानी करंजुदेवी ग्रामदेवता मारुती मंदिर ट्रस्ट चे माध्यमातून अवघ्या काही थोड्या कालावधीत चांगल्या प्रकारे जनहिताची कामे मार्गी लावल्याने गावकरी समाधान व्यक्त करीत आहेत.