
राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या समोरच राष्ट्रवादी पक्षांतील स्थानिक पुढाऱ्यांचे दोन गट आमने सामने
दैनिक चालु वार्ता
धुळे जिल्हा प्रतिनिधि
सोपान देसले
धुळे
धुळे आमदार रोहित पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. धुळे शहरात पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीज चौकात त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्याता आला होता. मात्र या बॅनवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो नव्हता. यावेळी त्यांच्या स्वागतसाठी बरेच कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते जमले होते.
रोहित पवार यांच्या समोरच झाली बाचाबाची
मात्र, रोहित पवार यांच्या स्वाागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार व गोटे समर्थक यांच्यात बाचाबाची झाली. रोहित पवार यांच्या समोरच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटाटपी झाली.