
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी- पंकज रामटेके
गुरुवारी ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष श्रीनिवास गोसकूला यांनी वेकोलिच्या स्कुलबसने शालेय विद्यार्थ्यांना नेण्यात यावे अशी मागणी वेकोलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घुस परिसरातील गांधीनगर, सुभाषनगर, रामनगर, शास्त्रीनगर या वसाहतीत राहणारे शालेय विद्यार्थी खाजगी शाळेत शिक्षण घेण्यासाठी जातात येथील शालेय विद्यार्थ्यांना वेकोलिच्या स्कुलबसने जाणे येणे करू द्यावे.
कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. येथील विद्यार्थ्यांना वेकोलिच्या स्कुलबसने जाणे येणे करू देण्यात येत नाही. वेकोलिने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळू नये. तत्काळ वेकोलिने आपल्या स्कुलबसने येथील विद्यार्थ्यांना जाणे येणे करू द्यावे अन्यथा वेकोलिविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे राज शेट्टी, रवी दिकोंडा, योहान इरगुराला, मनोज सोनुले, सत्यनारायण डखरे, रितिक मडावी, गोविंद झाडे, पुंडलिक खनके, राज पेद्दापेल्ली उपस्थित होते.