दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
आज दि 1 जुलै 2022 रोजी कृषी विभाग धुळे आणि जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीदिन कार्यक्रम मौजे असली तालुका शिरपूर येथे आयोजित करण्यात आले भोरखेडा येथील प्रगतशील शेतकरी श्री शिवाजी राजपूत यांच्या बांबू लागवड प्रक्षेत्रास भेट देऊन बांबू झाडांचे मान्यवरांनी लागवड केले तसेच श्री सरकार साहेब यांनी वृक्षवल्ली चे महत्व व श्री जलज शर्मा कलेक्टर धुळे यांनीसुद्धा कार्यक्रमास भेट देऊन कृषी दिन व कृषी दिनाचे महत्त्व सांगितले….
त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री तुषार रंधे साहेब तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. विठ्ठल जोशीसाहेब, KVK धुळे येथील डॉ.नांदरे सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मा.श्री मालपुरे साहेब, आत्मा प्रकल्प उपसंचालक मा.राठी साहेब, तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभसाहेब आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते