दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
वृत्तसेवा:- केंद्रिय सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट विकासरत्न संजय गाढवे यांनी घेऊन धाराशिव जिल्ह्यासाठी तसेच भुम शहरातील, ग्रामीण भागातील सुशिक्षित,कष्टकरी युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा बाबतीत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.केंद्रिय सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातुन, देशातील सुमारे ४५ टक्के आर्थिक उत्पन्न हे असंघटीत व लघू उद्योगातुन मिळते. रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देणारे खाते आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्ह्याचे नेते विनोद गपाट उपस्थित होते.