
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी-प्रा .मिलिंद खरात
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत वाडा तालुक्यातील मौजे अंबिस्ते खुर्द येथे आज कृषी दिना निमित्त कृषी विभाग वाडा यांनी अंबिस्ते खुर्द येथील शेतकरी श्री. मिलिंद सावंत यांच्या प्रक्षेत्रावर (शेत जमीन ) यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रसंगी वाडा कृषी विभागा मार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात शेतीसाठी यांत्रिकीकरण पद्धती चा अवलंब करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. शिवाजी इंगळे यांनी केले यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी शिंदे साहेब,बीटीएम बांगर साहेब ,कृषी पर्यवेक्षक संखे साहेब ,कृषी सहायक भारत बवधनकर,आनंद साबळे,हरिष चौधरी,अप्पासाहेब भराट, रामदास बात्रा व शेतकरी उपस्थित होते.