दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व राजवर्धन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय (मामा) शिंदे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहापूर्ण वातावरण शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील संजय मामा शिंदे यांचे समर्थक व युवकांनी विविध कार्यक्रम व फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त संजय मामा यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.संजय मामा यांची पुढील कारकिर्द यशस्वी होवो .त्याच बरोबर संजय (मामा) शिंदे यांच्याकडून जनसेवा घडत राहो,अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी संजय मामा म्हणाले, आपल्या माध्यमातून यापुढे जनसेवा करत राहिन, विकासाबाबत लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नशील राहिल असे सांगितले.तसेच शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील हजारो युवक आणि नागरिकांनी जे आजपर्यंत प्रेम दिले आहे ते यापुढेही माझ्यावर कायम राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शेटफळ हवेली गावचे विद्यमान सरपंच मा.श्री.संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य महेश नरबट, रायबा नरबट, अक्षय हजारे उर्फ सोन्या, अनिल मोरे, संतोष शिंदे,संजय नरबट, महावीर चव्हाण, लखन नरबट, शिवाजी साठे, पिंटू नवले, सुभाष पवार, अतुल नरबट, विशाल शिंदे, सचिन चव्हाण,राजु शिंदे, संतोष नरबट,समीर साठे व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.