
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यातील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे.
पक्षाने थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे हकालपट्टीची कारवाई केल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षाचे चाळीस हून अधिक आमदार फोडले. त्यानंतर सुरत गाठले. सूरतनंतर गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्यही नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. ‘तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे.त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून दूर करत आहे’, असे उद्धव ठाकरेंनी पत्रात लिहिले आहे.