
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
राज्यात मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला काल वेगळं वळण मिळाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवली जात असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर झालं.
या धर्तीवर काल संध्याकाळी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.
मात्र महाविकास आघाडी सरकार जाताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे NCP अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे. “2004, 2009, 2014 आणि 2020 च्या लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इन्कम टॅक्सने नोटीस पाठवली आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
तसेच काल शिवसेना नेते संजय राऊत हे देखील ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीसारख्या (ED) एजन्सीद्वारे महाराष्ट्रातील अनेक आमदारांची चौकशी सुरू आहे. ईडीचा उपयोग राजकीयदृष्या केला जात आहे, इन्कम टॅक्स, ईडी व सीबीआयचा (CBI) राजकीय वापर चिंताजनक हा चिंताजनक आहे. वेगळ्या विचारांच्या व्यक्तींविरुद्ध ईडी या एजन्सीचा वापर होतो,” असं शरद पवार म्हणाले आहेत.