
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:-बाळासाहे सुतार
बावडा तालुका इंदापूर येथे कैलासवासी गिरजाबाई भणेंच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बावडा यथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे अल्पशा आजाराने दिनांक 1 जूलै रोजी पहाटे दु:खद निधन झाले. दुपारी ठिक 2 वाजता त्यांच्यावर भरणेवाडी तालुका इंदापूर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. बावडा बाजारतळ प्रांगणात राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोकसभचे आयोजन करण्यात आले.यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रीचे दु:खद निधन झाले. ही बातमी कळताच बावडा गावातील ग्रामस्थांनी दुकाने सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत बंद ठेवून गिरीजाबाई विठोबा भरणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी संग्रामसिंह पाटील यांना गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्या बद्दल बोलताना आश्रू आनावर झाले.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याची बातमी समजताच इंदापूर तालुक्यातील जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे. इंदापूर तालुक्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.भरणे परिवारा वरती जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्या दु:खातून सावरण्यासाठी भरणे परिवाराला बळ मिळो आसे यावेळी बोलताना संग्रामसिंह पाटील बोलत होते.
यावेळी उपस्थित संग्रामसिंह पाटील, उपसरपंच निलेश घोगरे,शितल कांबळे, जालिंदर गायकवाड, नंदू गायकवाड, दत्तात्रय घोगरे, पिंटु ढवळजकर, राजू होनमाने,जिग्णेश कांबळे, इत्यादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत हो.