
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड :- आम आदमी पार्टीचे जनसंपर्क कार्यालय उदघाटन व जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील कदम यांचा वाढदिवस साजरा करताना जिल्हा सचिव डॉ. अवथूत पाटील पवार म्हणाले की, आम आदमी पार्टीचा बोर्ड प्रत्येक वार्डात व प्रत्येक गावात लागावा….! दिल्ली नंतर पंजाब या राज्यात आम आदमी पार्टीची सत्ता स्थापन झाल्या नंतर आता महाराष्ट्रात ही आय आदमी पार्टी नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच पार्टीने घोषित केले आहे. या साठी प्रत्येक ठिकाणी पार्टीचे कार्यालय सुरू होत आहे. दि. १/७/२२ रोज शुक्रवारी जिल्हा सचिव डॉ.संभाजी पवार यांच्या कार्यालयाचे उदघाटन एक आम व्यक्ती वाॅचमॅन दिगंबर गायकवाड यांच्या हस्ते सिडको मोंढा येथे करण्यात आले. या प्रसंगी नरेंद्रसिंघ ग्रंथी, एॅड रितेश पाडमुख, एॅड जगजीवन भेदे, अजित बनसोडे यांची समायोजित भाषणे झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कदम, सह सचिव रितेश पाडमुख, दक्षिण विधानसभा प्रमुख जगजीवन भेदे, युवा जिल्हाध्यक्ष अजित बनसोडे, पंढरी मोरे, बालाजी मोरे, माधव रिंघलवाड किशोर गच्चे , माधव पवार, संभाजी चंदापुरे, डॉ. संभाजी पवार यांची उपस्थिती होती.