
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि :- ०२/०७/२०२२ डाॅक्टरांनी रूग्नांच्या सेवेत सातत्याने समर्पित भावनेने काम केले असून
डाॅक्टरांच्या या सेवावृत्तीची समाजाने सातत्याने जाणीव ठेवावी असे प्रतिपादन माजी आमदार बब्रूवान खंदाडे यांनी केले.
सम्राट मित्रमंडळ -लातूर-अहमदपूर च्या वतीने डाॅक्टर दिनाच्या निमित्ताने शहरातील डाॅक्टर बांधवांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.प्रमुख पाहूणे म्हणून सत्कार मूर्ती म्हणून डाॅ. पांडूरंग कदम, डाॅ. चंद्रकांत उगीले, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बिराजदार,
डाॅ. ओमप्रकाश किनगांवकर,डाॅ. धिरज देशमुख,डाॅ.मधुसूदन चेरेकर,डाॅ. राजूरकर,डाॅ.बयास,डाॅ. सतिश पेड, डाॅ. चलवदे,डाॅ. निलेश मजगे,डाॅ.सिंहाते,डाॅ.पदातूरे, डाॅ.होळकर, डाॅ. जोशी, डाॅ. कराड,डाॅ. सय्यद मूस्तफा, डाॅ. अखिल शेख, डाॅ. मूंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी सर्व डाॅक्टर्स मंडळींचा शाल पुष्पगूच्छ देवून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वे॓ळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संयोजक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,जनतेची थेट सेवा करता येणारे क्षेत्र म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे पाहीले जाते.आज खूप मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून यातून मानवी जीवन सुखी,संरक्षीत करण्याचा प्रयत्न होत आहे.करोना सारख्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स मंडळींनी करोडो लोकांचे जीव वाचविले आहेत.त्यामूळे संबंध मानव जातीवर डाॅक्टर्स मंडळींचे उपकार आहेत असं म्हटलं तर ते धाडसाचं ठरणार नाही.या सेवेबद्दल मानवी समाज कृतज्ञ आहे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी डाॅक्टर ओमप्रकाश किनगांवकर, डाॅ.पांडूरंग कदम,डाॅ. मधुसूदन चेरेकर यांची समायोचीत भाषणे झाली.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन धनंजय उजनकर यांनी केले तर आभार प्रशांत जाभाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय भालेराव,राहूल गायकवाड, शिवाजीराव भालेराव, गणेशराव मूंडे,संभाजीराव कांबळेसर आकाश सांगवीकर, त्रीशरण मोहगांवकर, भीमराव कांबळेसर,गिरिश गोंन्टे, परिवर्तन कांबळे, आदित्य भालेराव ,ज्ञानेश्वर केंद्रे आदींनी पुढाकार घेतला.