
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -नर्सिंग पेठकर
दि. १जूलै २०२२ रोजी ग्राम पंचायत कार्यालय बहाद्दरपुरा येथे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली .रावे प्रोग्राम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी ग्राम पंचायत सरपंच सौ.गोदावरी अर्जुन गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य बालाजी तोटवाड,ग्राम पंचायत सदस्य भीमराव कदम,ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी शंकरराव खरात, बालाजी पेठकर,शिवाजी वंजे, वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय नेहरू नगर कंधार चे (प्रिंसीपल)डॉ.रमेश पवार , डॉ.संजय पवार, डॉ.विनोद पवार तसेच विद्यार्थीनी व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.