
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
शेंबा.(नांदुरा) दि.२. केंद्रीय जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेंबा येथे १४ ट्रीस फाउंडेशन वतीने फळझाडांची स्वहस्ते लागवड करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांची लागवड करणे ही काळाची गरज ही बाब लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष प्रवीण भागवत यांनी संस्थेचे निर्माण करून पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ८० हजाराहून अधिक झाडांची लागवड केलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या संस्थेचे व्यवस्थापक अनंत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात सुरुवात झालेली आहे. संस्थेच्या वतीने सर्व इच्छुक ग्रामपंचायती, शाळा, तसेच विविध संस्था यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन १४ ट्री स फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे. तरीसुद्धा इच्छुक लोकांनी फुली म्हधे स्थित फाउंडेशनच्या शाखा नंबर 2 यांच्याशी या नंबर वर (७६२०६४३२९२) संपर्क करून आपला सहभाग व सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे. मराठी प्राथमिक शाळा शेंबा येथे संस्थेच्या वतीने लागवड समयी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष किशोर वाकोडे तसेच माजी अध्यक्ष शशिकांत भोपळे, मराठी प्राथमिक शाळा शेंबा मुख्याध्यापक बालोद सर, शिक्षक निवास सर, कुलकर्णी सर, पाटील सर, तसेच सुमन अढाव मॅडम, कविता शिंदे मॅडम आदी उपस्थित होते.